बायोकॉम्बी - २
कांसोर्शिया न्युट्रीएंट अपटेक ऑर्गनिझम.
बायोकॉम्बी -२ ज्यामध्ये अझोटोबेक्टोर, फॉस्फेट विरघळणारे जीवाणू, पोटाश मोबिलायझिंग बेक्टेरिया आणि स्युडोमोनास फ्लुरोसेंस यांचे मिश्रण आहे.
फायदे :
- वातावरणातील नायट्रोजन चे स्थिरीकरण करते.
- स्थिर स्फुरद विरघळवून ते पिकांना उपलब्ध करून देते.
- मातीतून अनुपलब्ध पोटाश एकत्रित करून ते वनस्पती/ पिकांना उपलब्ध करून देते.
- पांढऱ्या मुळाच्या विकासाला चालना देते.
- २५% रासायनिक पोटाश/ फॉस्फेटिक खताची बचत करते
- पिक उत्पादनात २०-२५ % वाढ.
- पिकाची रोग/किडी प्रतिरोधक क्षमता वाढवते
- पिकांची गुणवत्ता सुधारते.
फवारणी करण्याची पद्धत आणि डोस :
- सेट/बीज प्रक्रिया – १०० मिली बायोकॉम्बी -२ पुरेशा प्रमाणात पाण्यात मिसळून द्रावण तयार करा. १० किलो बियाण्याची प्रक्रिया करण्यासाठी द्रावण पुरेसे आहे, बिया सावलीत कोरड्या करा, पेरणी लगेच करावी.
- रोपांची मुळे बुडविणे – ५०० मिली बायोकॉम्बी २ पुरेशा प्रमाणात पाण्यात मिसळा, वरील मिश्रणात ४% गुळ घाला आणि रोपांची मुळे रोपे लावण्यापूर्वी १०-१५ मिनिटे त्यात बुडवा. १ एकर लावणीसाठी आवश्यक असलेल्या रोपांसाठी ५०० मिली बायोकॉम्बी -२ पुरेसे आहे.
- मातीचा वापर – १ लिटर बायोकॉम्बी -२ पुरेशा प्रमाणात पाण्यात मिसळून ते २०० किलो चांगले कुजलेले शेणखत वर शिंपडा, मिश्रण मिसळा आणि वाफसा स्थितीत १ एकरवर प्रसारित करा.
- ठिबक/तुषार सिंचनाद्वारे – एकर क्षेत्रासाठी १ लिटर बायोकॉम्बी -२ ठिबक किंवा तुषार सिंचनाद्वारे करा.
- स्लरी/जीवामृत द्वारे – २०० लिटर स्लरी/जीवामृत तयार करा, ५ दिवसांनी त्यात बायोकॉम्बी -२ मिसळा, मिश्रण जसे आहे तसेच ठेवा आणि ४८ तासांनी लावा.
फवारणीची मात्रा:
फवारणीसाठी :२-२.५ मिली/लिटर पाण्यासाठी
जमिनीतून : १ लिटर/एकर